दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – संभाजी गोसावी
सातारा.मेढा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बिभवी ता.जावली येथे गारवा हॉटेलमध्ये अवैध दारु विक्री केल्याप्रकरणी मेढा पोलिसांनी हेमंत शंकर गायकवाड ( वय 35 रा.ओझरे ता जावली) यांस अटक करुन. याप्रकरणी एकूण २८.७२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यांत यश आले. या कारवाईत सातारच्या पोलिस पथकांने देशी दारुच्या ४८ व इतर ७१ बाटल्या जप्त केल्या. सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, बावळेकर , राणी फडके प्रशांत मोरे, ओकार दीक्षित करीत आहेत. दरम्यान सायगाव आणि आनेवाडी येथे केलेल्या दुसऱ्या कारवाईत मेढा पोलिसांनी देशी दारु, मोटरसायकल्स एकूण ५६.६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त हस्तगत करण्यांत आला. याप्रकरणी प्रकाश कृष्णा जाधव ( रा.सायगाव) आणि विशाल विश्वांस फरांदे ( रा. आनेवाडी) या दोघांना अटक करण्या़त आली. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, वाई उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.शितल जानवे खराडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, पोलीस कॉन्स्टेबल पद्मसेन घोरपडे, नितीन जाधव ,पांडुरंग माने, दिगंबर माने पोलीस हवालदार इम्रान मेटकरी आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला
