
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालून वादळी पावसाने शेतातील फळपिकांचे व उसाचे पंचनामे करून मदत जाहीर करावी शेतकऱ्यांची मागणी.
बावडा ते नीरा नरसिंहपूर परिसरात बुधवार दिनांक 8 रोजी सायंकाळी मृग नक्षत्राच्या सुरवातीलाच मेघगर्जना सहित विजांचा कडकडाट आवाज होऊन पावसाने जोरदार हाजेरी लावली.आचानक झालेल्या पावसामुळे शेतातील केळी, आंबा, पेरू, लिंबू, डाळिंब, ऊस, मका,क्ष कडवळ, या सारखी शेतकऱ्यांची शेतातील पिके जमीन दोस्त झाल्याने शेतकरी राज्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे.
एकीकडे कर्जाचा डोंगर तर दुसऱ्या बाजूने निसर्गाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे.टणु येथील माजी सरपंच आशोक शिवलिंग बळते, यांची केळी 3 एकर,, शिवलिंग बळते कळी 2 एकर,, धनाजी उद्धव मोहपरकर 20 गुंठे,, उद्धव हरिबा मोहपरकर 6 एकर,, निलेश ब्रह्मदेव गोखले 4 यकर,, शंकर मनोहर शिंदे 6 एकर,, योगेश शंकर जगताप,,आशोक बाळकृष्ण मोहोळकर,, पंढरीनाथ लक्ष्मण डिसले,, नरसिंह मल्हारी जगताप,, दादासाहेब सदाशिव जगताप 4 एकर,, आजीतशिंह तुकाराम गायकवाड 4 एकर,, सौदागर आर्जुन शिरसागर,, ब्रह्मदेव प्रताप शिरसागर,, आरविंद आण्णा डिसले,, संदिप अरविंद डिसले,, या भागातील सर्व शेतकऱ्यांची केळी पिके जमिनदोस्त झाली तर येथील
वादळी वाऱ्यामुळे काही लोकांचे पत्र्याची लोखंडी शेड तर नारळा सारखे फळांचे वृक्ष विजेचे खांब, जमीनीवर कोसळलेले आहेत.
नुकसान झालेल्या पिकांची टक्केवारी न पहाता राज्य शासनाने ताबडतोब याकडे लक्ष देऊन सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामे करून भरपाई मिळावी आसी गरीब शेतकऱ्यांची मागणी आहे.
नरसिंहपुर, गिरवी, आडोबावस्ती,ओझरे, गोंदी, पिंपरी बुद्रुक, टणु, गणेशवाडी, बावडा, सराटी, वकिलवसती, लुमेवाडी,सुरवड,लिंबुडी, या सर्व भागाला पावसाने झोडपले. सर्व भागाची महसुल विभागामार्फत शेतकऱ्यांची चौकशी घेऊन पावसाने झालेल्या नुकसान पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने देण्यात यावे व मदत मिळावी