
दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे.
धरणगाव: दि.११. राष्ट्रीय क्रमांक ६ वर असलेल्या धरणगाव येथील शाळेच्या रस्त्यालगत हायवेवर लोखंडी घर तयार करण्यात येत असून ती तातडीने हटविण्यात यावे अशी मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा धरणगाव यांनी केली आहे.शाळेत येणारे व जाणारी वाहने तसेच स्कूल बस, कार ,मोटरसायकल, विद्यार्थ्यांच्या सायकली त्यांना ये/जा करण्यास मोठी अडचण होणार आहे.
साडे पंधराशे विद्यार्थी व विद्यार्थिनी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. या टीन शेड च्या घरामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की राष्ट्रीय महामार्ग हद्दीमध्ये रोडचे काम चालू असताना लोखंडी शेडचे घर उभे करणे सुरू आहे. सदर घराचे काम शाळे च्या रस्त्याला लागून सुरू आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना दिसणार नाही त्यामुळे या टीन शेड घराबाबत कल्याण टोलचे मालक मनियार यांच्याशी भ्रमणध्वनीवरून बोलणे केले असता ती हायवे ची सरकारी हद्द आहे. त्याबाबत तुम्ही काहीही म्हणू शकत नाही असे उत्तर त्यांनी दिले. यावरून या टीन शेड सदृश्य घराकरिता कल्याण कंपनी जबाबदार आहे. तेव्हा या प्रकरणी लक्ष घालून सदरचा प्रकार थांबविण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली.