
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
निमगाव – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त राजसाहेबांना निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावे, त्यांची होणारी शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, इंदापूर तालुका यांच्या वतीने सकाळी ९.३० वा. निमगाव केतकीचे ग्रामदैवत केतकेश्वर महादेव मंदिरात विधिवत रुद्राभिषेक करण्यात आला.
यावेळी राजसाहेबांवर होणारी शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, त्यांनी पाहिलेलं महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न लवकर साकार व्हावं यासाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू भोंग, मंगेश भोंग, तानाजी जगताप, शिवा भोंग, अंबादास जगताप, गणेश भोंग इ.उपस्थित होते.