
दैनिक चालू वार्ता पंढरपूर प्रतिनिधी-सुधीर आंद
समाजात वावरताना आपने समाज्याचे ,निसर्गाचे देणे लागतो या भावनेतून रक्तदान श्रेष्ठदान या उद्देशाने वाढदिसाचा व्यर्थ खर्च टाळून रणदिवे बंधूंनी हा सामाजिक उपक्रम केला
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे व नवनाथ रणदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त व तुंगत ता पंढरपूर शेतकरी पुत्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था तुंगत यांच्या वतीने येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात तु़ंगत परिसरातील ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले संस्थेचे अध्यक्ष व स्वाभिमानी चे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी आतापर्यंत २१ वेळा रक्तदान केले,
रक्तदान शिबीरासाठी विजय रणदिवे, पंकज लामकाने, राजु भोसले, समाधान पवार, श्रीकांत आवताडे, संतोष रणदिवे शब्बीर मुलाणी , ताजुद्दीन मुलाणी , मंगेश रणदिवे, विशाल वनसाळे , अमोल शिंदे, उपस्थित होते हे रक्तदान शिबीर संपन्न करण्यासाठी नवनाथ रणदिवे, सागर रणदिवे, भास्कर पवार,राजु भोसले , युवराज इंगळे, प्रविण माने यांनी परिश्रम घेतले रक्त संकलण श्री बसवेश्वर ब्लड बँक सोलापूर यांनी केले