
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर:- लासुर स्टेशन-बाभुळगाव-पाडळसा या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम ८ फेब्रुवारी २००८ रोजी १ कोटी २९ लाख रूपये ग्रामविकास मंञालय भारत सरकार यांच्या अर्थ सहाय्याने पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम विभाग मार्फत झाले होते. त्याचा देखभाल दुरुस्तीसाठी ५ लाख ३३ हजार रूपये दि ८ फेब्रुवारी २०१३ पर्यंत अतिरिक्त देण्यात आले होते. परंतु २०१३ कार्यकाळ संपल्यानंतर आज पर्यंत लासुर स्टेशन-बाभुळगाव-पाडळसा रस्त्याचे नव्याने काम झाले नसल्याने देर्हळ,किन्नळ, पाडळसा, बाभुळगाव, अनंतपूर शिवारातुन दररोज शेतीच्या, नोकरी निमित्त शिक्षणासाठी येणार्या शेतकरी, विद्यार्थी नागरिकाना गेल्या ९ वर्षा पासून दररोज व दर पावसाळ्यात मोठा ञास सहन करावा लागतो.
मध्यंतरी पाडळसा गावाजवळ थातुर मातुर काम केल्याचे परिसरातील नागरिक सांगतात परंतु २०१४ नंतर जिल्हा परिषद, राज्यात व केंद्रात सरकार बदलले तेव्हा अशा होती कि रस्त्याची लाबी वाढवुन देर्हळ, किन्नळ मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यात येईल परंतु सत्तेतील लोकप्रतिनिधी असुन सुद्धा गेल्या ९ वर्षापासून लासुरस्टेशन-बाभुळगाव पाडळसा या रस्ताच्या बाबतीत स्थानिक लोकप्रतिनिधी परिसरातील नागरिकांना होणार्या यातना पासुन मुक्ती देण्याचा प्रयत्न केलेला दिसुन येत नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात ज्या नागरिकांनी आपल्या भरघोस मतदान केले त्यांचा विसर स्थानिक लोकप्रतिनिधी पडला की असा सवाल शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर यांनी उपस्थित केला आहे.
समृद्धी महामार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषद , सार्वजनिक बांधकाम विभागाला, तहसीलदार गंगापूर यांना इंजी महेशभाई गुजर यांच्या माध्यमातून लिखीत कळविण्यात आले होते. त्यावेळी समृद्धी महामार्ग पुर्ण झाल्यानंतर समृद्धीच्या ठेकेदाराकडून १) लासुर स्टेशन-धामोरी-डोणगाव-रायपुर-पिंपळगाव २) लासुर स्टेशन-बाभुळगाव-पाडळसा ३) बाभुळगाव-डोणगाव ४) बाभुळगाव- जयभिमनंगर- वैरागड ५) लासुर स्टेशन वैरागड ते देवगाव फाटा तसेच शेत रस्ते शिवरस्ते पुर्ण करून घेण्यात येईल असे आश्वासन तत्कालीन तहसीलदार,कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिले होते परंतु आता समृद्धी महामार्गाचे काम पुर्ण झाले आहे तरी सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास का तयार नाहीत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
प्रतिक्रिया
गेल्या काही वर्षात लासुर स्टेशन परिसरातील अनेक रस्ते न झाल्याने किवा चांगले रस्ते समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पुर्ण उध्वस्त झाल्याने येणार्या निवडणूकीत आपल्या समशा जाणुन घेणारा ,ग्रामीण भागातील ,सुशिक्षित लोकप्रतिनिधी देण्याची गरज आहे. या बाबत परिसरातील नागरिकांनी विचार करायला हवा..शेतकरी नेते इंजी महेशभाई गुजर पिंपळगाव दिवशी