
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – राज्यातील परिस्थिती आणि झालेली राजकीय उलथापालथ ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे. या राजकीय घडामोडींना काहीही अर्थ नाही अशा पद्धतीने राजकारण करणे योग्य आहे हा महाविकास आघाडी सरकारचा विश्वासघात आहे अशी टीका काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी केली आहे. तांत्रिकदृष्ट्या व्हीप नाकारणे अयोग्य शिवसेनेने आमदारांना सभागृहात बजावलेला व्हीप आमदारांनी झुगारून विरोधी पक्षाला मतदान केले आहे हे अत्यंत चुकीची बाब आहे या संदर्भात न्यायालयात खटला प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला नक्की न्याय मिळेल अशी भूमिका भाई जगताप यांनी व्यक्त केली. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. राज्यातील परिस्थिती काहीही असली तरी मुंबई महानगरपालिका निवडणुका आम्ही यापूर्वी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या निर्णयावर कायम आहोत असेही भाई जगताप यांनी स्पष्ट केले.