
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : उरुळी कांचन येथील पद्मश्री कोऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक आणि संचालकाने मिळून पतसंस्थेची १ कोटी २८ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार लेखा परिक्षणात उघड झाला आहे. व्यवस्थापकाने ठेवीदारांच्या रकमेतून स्वतःच्या फायद्यासाठी ८३ लाख तसेच संचालकाने कोणालाही विश्वासात ने घेता ४५ लाखांचे कर्ज मंजूर करून फसवणूक केली. याप्रकरणी पतसंस्थेचे संचालक तसेच व्यवस्थापक यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी संचालक संजय दिगंबर कांचन आणि व्यवस्थापक विकास मारूती लोंढे (दोघे. रा. उरूळी कांचन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत लेखापरीक्षकांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कांचन यांनी आत्महत्या काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. कांचन हे उरूळी कांचनमधील पद्मश्री कॉ. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक होते. लोंढे पतसंस्थेत व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते.