
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
——————————————-
उदगीर/ प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व रोटरॅक्ट क्लब उदगीर यांचा संयुक्त पदग्रहण समारंभ येथील राजराजेश्वरी मंदिर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीचे माजी प्रांतपाल विष्णू मोंढे, सहाय्यक प्रांतपाल नंदकिशोर लोया यांची उपस्थिती होती.प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मंचावर रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलचे सन २०२२-२३ चे अध्यक्ष रो.रामेश्वर निटूरे , सचिव रो.व्यंकटराव कणसे तसेच रोटरॅक्टचे नूतन अध्यक्ष अमोल पोलावार सचिव तेजस अंबेसंगे, सौ.निटूरे , सौ.कणसे यांची उपस्थिती होती.
यावेळी मावळते अध्यक्ष रो.प्रमोद शेटकार व सचिव रविंद्र हसरगुंडे यांनी मिटिंग कॉल टू ऑर्डर करून राष्ट्रगीताने करण्यात आली. यात मावळते अध्यक्ष यांनी वर्षभर झालेल्या प्रोजेक्ट्स बद्दल माहिती दिली तर सचिवांनी सन २०२१ – २२ वर्षात झालेल्या सर्व जमाखर्चचा तपशील सांगितला.
यानंतर मावळते अध्यक्ष व सचिवांनी नूतन अध्यक्ष व सचिवांना कॉलर प्रदान केले.प्रांतपाल व सहाय्यक प्रांतपाल यांनी चार्टर प्रदान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. नंतर नूतन अध्यक्ष रो.रामेश्वर निटूरे यांनी सन २०२२ – २३ वर्षाचे प्रोजेक्ट व गोल संदर्भात सविस्तर माहिती दिली. सहाय्यक प्रांतपाल नंदकिशोर लोया यांनी सर्व रोटरीयन्सला वर्षभरात करावयाच्या कामाची सविस्तर माहिती दिली तर माजी प्रांतपाल विष्णू मोंढे यांनी रोटरी क्लबची इमेज आणि रोटरी क्लब आंतरराष्ट्रीय लेवलवर काय कार्य करते याची माहिती देत ते म्हणाले की, रोटरीचे कार्य हे फक्त अध्यक्ष व सचिवांचे नसून प्रत्येकांनी याची ट्रेनिंग घेतली पाहिजे आणि आपल्याच रोटरी परिवाराचे कार्य आहे असे समजून प्रत्येक सदस्याने एकमताने काम केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमांचे संचलन रो.विशाल जैन व रो.मंगला विश्वनाथे यांनी केले तर आभार रोटरी क्लबचे नूतन सचिव रो.व्यंकटराव कणसे यांनी मानले .