
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी – गोविंद पवार
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लोहा तालुका कार्यकारिणी जाहीर
लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी लोहा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत केले.
लोहा येथील शासकीय विश्रामगृहात दि. १५ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची लोहा व कंधार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष अंगद पाटील माडकिकर,जिल्हा कार्यअध्यक्ष ओम वरळे, लोहा तालुका अध्यक्ष मारोती पाटील भुजबळ, लोह तालुका उप अध्यक्ष गजानन सावळे,लोहा तालुका सचिव – तिरुपती पाटील कापसे, कंधार तालुका कार्याध्यक्ष -प्रेम पाटील वारकड, लोहा तालुका संघटक -कामेश बडवणे, लोहा तालुका कार्याध्यक्ष -गणेश कापसे, नांदेड दक्षिण ता.संपर्कप्रमुख अक्षय मोरे लोहा तालुका कोषाध्यक्ष- भाऊराव पाटील येवले, लोहा तालुका सरचिटणीस- व्यंकट पाटील कदम तालुका कार्यकारिणी सदस्य- राहुल पाटील कदम, सोनखेड सर्कल प्रमुख – साईनाथ पांचाळ, कंधार तालुका संपर्क प्रमुख – लक्ष्मण पाटील फुलवळे ,लोहा तालुका सहसचिव – गोविंद पाटील वरळे, कलंबर सर्कल प्रमुख- सतीश पाटील भुजबळ, लोहा तालुका सचिव
आदी ची निवड करण्यात आली असून सदरील निवडीचे पत्र लक्ष्मण मोरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी धर्मवीर शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव लक्ष्मण चव्हाण बालाजी दिघे, गजानन मोरे, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे पुढे बोलताना म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे. शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राजू शेट्टी हे नेहमी अग्रेसर असतात.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली व डॉ.प्रकाश पोपळे,हणमंत रजेगोरे यांच्या साथीने स्वाभिमानी शेतकरी संघटना नांदेड जिल्ह्यात व लोहा तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती च्या निवडणूका लढविणार आहे .
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विस्तार गावपातळीवर करण्यात येणार आहे असे लक्ष्मण मोरे म्हणाले.