
दैनिक चालु वार्ता विशेष प्रतिनिधी-पंकज रामटेके
पूरग्रस्त पळसगाव शेतीशिवाराची यांनी केली पाहणी…
जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र प्रचंड नुकसान झाले आहे.
बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव, कोठारी, आमडी, कटवाली, बामणी, कवडजी, किन्ही, कळमना, दहेली व लावरी या गावांतील शेतात पाणी घुसल्याने गेल्या चार दिवसांपासून जवळपास पाचशे हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आहे. लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार आज दि.१५ जुलै २०२२ शुक्रवार रोजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शेतशिवाराची पाहणी केली.
ऐणं पेरणी केलेल्या शेतात पाणी तुंबुन असल्यामुळे अंकुरणीवर आलेले बियाणे कुजले आणि हातचे पीक गेले आहे. त्यामुळे शेतकर्यांनी भरघोस नुकसानभरपाईची मागणी केली. यावेळी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी मुंबई येथून आभासी पद्धतीने शेतपरीसराची पाहणी केली व शेतकऱ्यांशी सकारात्मक संवाद साधला.
त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी, तहसिलदार आणि तलाठी यांना आभासी पद्धतीने शेतपरीसर दाखवून आजचं याठिकाणी पाहणी करून लवकरात लवकर योग्य पंचनामे करावे, अशा सुचना जिल्हाध्यक्ष( गा) देवराव भोंगळे भ्रमणध्वनीहून केल्या.
या भेटीदरम्यान माजी जि. प. सदस्या सौ. वैशालीताई बुद्दलवार, सरपंच संदिप वेटे, उपसरपंच नितीन वांढरे, सौ. सुचिताताई गाले, पुंडलिक उपरे, वासुदेव गाले, बंडू खाडे, विलास वागद्रकर, श्रीहरी इटनकर, अशोक फटाले, मनीषा उपरे, सुरेखाताई वागद्रकर, रुपेश इटनकर, सूरज रागीट, मनोज इटनकर, रामदास इटनकर, सचिन फटाले, विजय जुमनाके आदिंसह शेतकरी बांधव याठिकाणी उपस्थित होते.