
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनीधी -गोविंद पवार
शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांचा वाढदिवस दिनांक 20 जुलै रोजी असल्याने माझ्या वाढदिवसानिमित्त मी नांदेड येथे काही कारणास्तव नसल्याने लोहा कंधार मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी हार तुरे यावर अनावश्यक वायफळ खर्च न करता लोहा कंधार मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम जसे रक्तदान शिबिर ,वृक्षारोपण, अनदान वाटप ,आरोग्य शिबिरे असे विविध सामाजिक उपक्रम राबवून
मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माझा 20 जुलै रोजी चा वाढदिवस साजरा करण्याचे नम्र आवाहन यावेळी शेकापच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांना केले आहे, यावेळी हरबळ येथे उपसरपंच अवधूत पा शिंदे व शेकडो गावकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांचा भव्य हार व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी गावकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.