
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी युवक कार्यकर्ते तथा मातंग शक्ती लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद वाघमारे यांची एकमताने निवड करण्यात आली
अहमदपूर शहरामध्ये नुकतेच समाजाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांची व्यापक बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष मुकुंद वाघमारे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी विशाल डावरे तर सचिवपदी सुरेश कसबे यांची निवड करण्यात आली जयंती महोत्सव समितीची कार्यकारणी सहसचिव आनंद किशन शिंदे कोषाध्यक्ष राजेंद्र मेकाले अभय शिंदे सह कोषाध्यक्ष आकाश डावरे तिरुपती वाघमारे कार्याध्यक्ष गिरीश गोंटे ,दीपक कांबळे प्रसिद्धीप्रमुख सुमित वाघमारे आदित्य डावरे, श्याम वाघमारे ,अविनाश वाघमारे मिरवणूक प्रमुख शाम डावरे, अमित वाघमारे तर सदस्य म्हणून दिनेश डावरे, शुभम डावरे ,अर्जुन डावरे ,आदित्य डावरे ,आशिष डावरे कैलास ,डावरे गुलाब डावरे, पिराजी वाघमारे, यांची निवड करण्यात आली आहे यंदा अबूतपूर्व उत्साहामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती वेगवेगळ्या उपक्रम राबवून करण्यात येणार असल्याची माहिती जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद वाघमारे यांनी यावेळी बैठकीमध्ये दिली या सर्व जयंती महोत्सव समितीचे शहरात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे