
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी – अनिल पाटणकर
धनकवडी,पुणे – पुण्यनगरीचे शक्तीपीठ असणाऱ्या श्री सद्गुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज मठामध्ये गुरुपौर्णीमेनिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सकाळी अभिषेक,पुजा व त्यानंतर श्रींचा पालखी प्रदक्षिणा सोहळा पार पडला.यावेळी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून शंकर महाराजांचे भक्तजन मुसळधार पावसात देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुरुपौर्णीमेनिमित्त समाधी स्थळाला विशेष फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळी १०.३० ते १२.०० या वेळात पालखी सोहळा संपन्न झाला तर दिवसभर खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी पुणे पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे हजारो भाविकांना व्यवस्थितपणे दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला.