
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे:-आज आयसीएससी बोर्डाचा २०२२ दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पुण्याची हरगुण कौर माथरू हिने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तिला दहावीत ९९.८० टक्के प्राप्त झाले आहेत. सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. आयसीएसई दहावीचा एकूण निकाल ९९.९७ टक्के इतका लागला आहे. तर, आयसीएसई दहावी बोर्ड परीक्षेत महाराष्ट्राचा निकाल १०० टक्के लागला आहे. ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. महाराष्ट्राच्या लेकींनी कमावला पहिला आणि दुसरा क्रमांक. यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. ९९.९८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ९९.९७ टक्के मुलं उत्तीर्ण झाले आहेत. पुण्याची हरगुण कौर माथरू ही देशात पहिली आली आहे. ती पुण्यातील सेंट मेरिज शाळेची विद्यार्थिनी आहे. तर मुंबईच्या जुहू येथील जमनाबाई नरसी स्कूलची अमोलिका मुखर्जी ही ९९.६० टक्के गुण मिळवून देशात दुसरी आली आहे. या परीक्षेत पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ इतकी आहे. दै. चालु वार्ता तर्फे कु. हरगुण माथरुचे हार्दिक अभिनंदन!