
दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी- शाम पुणेकर.
पुणे : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात इंदोर येथून पुण्याला जाणाऱ्या एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. MH 40 -N9848 ही बस पुलावरून खाली कोसळली. या अपघातात १२ जण ठार झाले आहेत. तर २५ जणांना वाचवण्यात आले आहे. खलघाट संजय सेतू पुलावर हा अपघात झाला असल्याची माहिती मध्य प्रदेशचे मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे. अपघातग्रस्त बस एसटी महामंडळाची आहे.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात सकाळी १० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस प्रवाशांनी भरली होती. बसमधून महिला आणि मुलांसह ५० हून लोक प्रवास करत होते. बस पुलावरुन थेट नर्मदा नदीत कोसळली. आतापर्यंत नदीतून १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातग्रस्त बस क्रेनच्या साह्याने नदीतून बाहेर काढण्यात आली आहे.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, इंदोर येथून पुण्याला जाणाऱ्या या बसच्या चालकाचे खलघाट संजय सेतू पुलावर वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस थेट नदीत जाऊन कोसळली. घटनास्थळी पोलीस, रेस्कू टीम कडून बचावकार्य सुरू आहे.