
दैनिक चालू वार्ताप्रतिनिधी-संभाजी गोसावी
हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये फिर्यादी विश्वजीत अशोक कांबळे वय ३०रा. इंद्रायणी सोसायटी साडेसतरा नळी हडपसर पुणे यांच्या घरांमध्ये दि.१० जुलै रोजी दुपारच्या सुमारांस घरफोडीची तक्रार दाखल होताच. हडपसर गुन्हे प्रकटीकरण विभागांचे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी चांगले तपासाला लागले असता. सदर तपासामध्ये घरांमध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड अगर कोणत्यांही इतर वस्तूंला हात लावला नव्हता. सदरची घरफोडी ही ओळखीच्या व्यक्तीनेच केली असल्यांचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. त्या अनुषंगाने तपासी पथकांतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तपासाला अधिक गती देत जावई निखिल संभाजी पवार यांस ताब्यांत घेवुन त्याच्याकडे अधिक विचारपूस करीत त्यांस पोलिसी खाकया दाखवतात त्याने सासरांच्या घरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याने सासरांच्या घरांतील सर्व मंडळी पिक्चरला गेलेचे पाहून त्याने बनावट चावीचा वापर करुन फ्लॅट उघडून घरांमध्ये प्रवेश केला. आणि कपाटातील सोन्यांची चैन,अंगठी गंठण कानांतील नेकलेस असा एकूण मुद्देमाल चोरुन नेला. आरोपीकडूंन त्याने चोरुन नेलेले ७० ग्राम मोजण्याचे सोन्यांचे दागिने असा एकूण ३.५०.०००/ रुपये किमतीचा मुद्देमाल हडपसर पोलिसांनी हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला. तर हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तपासी अधिकारी विजयकुमार शिंदे अविनाश शिंदे आणि अंमलदार शाहीद शेख व अविनाश गोसावी सुरज कुंभार यांच्या पथकांने हडपसर पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मागील ५ महिन्यांत ६० मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणून यात सोने मौल्यवान वस्तू आणि वाहने मिळून असा एकूण. ६७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. हडपसर पोलीस ठाण्यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील सर्व पोलीस अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांचे त्यांच्या कामगिरीबद्दल पुणे शहर प्रशासनाकडूंन कौतुक व अभिनंदन करण्यांत आले. सदरची कामगिरी मा.श्री नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे,मा. नम्रता पाटील पोलीस उपयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री बजरंग देसाई सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, मा. श्री.अरविंद गोकुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,मा.श्री विश्वांस डगळे , यांच्या तपासी पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.श्री विजयकुमार शिंदे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे,अंमलदार सुशील लोणकर,अविनाश गोसावी,संदीप राठोड आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.