
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर
किनवट माहूर तालुक्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्या पासून पावसाने फलंदाजी सुरू केली तर सतत दहा दिवस पाऊस झाल्याने किनवट माहूर तालुक्यातील शेत जमिनीमध्ये पाणीच पाणी होऊन अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिके वाहून गेली तर अनेक ठिकाणी पुराच्या पाणीमुळे शेतकऱ्यां च्या शेती खरडून गेल्या आहेत.मागील दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता,पण दोन दिवसांच्या विश्रांती नंतर दि.१७ जुलै रविवार रोजी पासून पुन्हा मुसळधार पाऊसाची सुरुवात झाली आहे.यात खरीप हंगामातील पेरणी होताच हिंगोली लोकसभा मतदार संघात पावसाने धुमाकूळ घातला आहे.सलग दहा दिवसापासून च्या किनवट माहूर च्या सर्व मंडळात अतिवृष्टीमुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. करिता किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात आता पंचनामे करण्यासारखे काही उरले नाही. किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दयावा.अश्या प्रकारची मागणी अखिल भारतीय परिवार पार्टीचे हिंगोली लोकसभा प्रभारी महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल मोहिते भारतीय.
यांनी शासन दरबारी मागणी करण्याचे आश्वासन तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पाहणी दरम्यान संवाद साधताना आश्वसन दिले.