
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील पेरणी केलेल्या पिकाचे सतत पावसामुळे नुकसान झाले असून, त्याचे तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतक-यांना मदत जाहिर करावी. यासंदर्भात उपविभागिय अधिकारी सौ.रोहिणी न-हे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष विलास शाळू, तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे,कार्याध्यक्ष अँड सिराज मोगल,विधानसभा अध्यक्ष दत्ता तांबे, विधानसभा युवक कांँग्रेस उपाध्यक्ष मोईज सय्यद ,तालुका उपाध्यक्ष अँड घनश्याम लांवड, प्रभाकर डोंबाळे, शहराध्यक्ष राजू साठे, राम सावंत, बादशाह शेख, फिरोज बागवान,बाबासाहेब नायकिंदे मुकूंद काळे, अमोल शिंदे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.