
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
:-गुगलवर औरंगाबाद शोधल्यानंतर शहराचे नाव संभाजीनगर समोर येत आहे. तसेच गुगल मॅपवर शहराचे नाव इंग्रजीत संभाजीनगर झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने औरंगाबाद, उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय नुकताच घेतला होता. औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच नवी मुंबई विमानतळाचे नाव लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शासकीय सोपस्काप बाकी असला तरी औरंगाबाद शहराचे गुगलवर संभाजीनगर नाव आले आहे. तसेच उस्मानाबादचे धारशीव नाव आले आहे.
शहराच्या नावासाठी ही प्रक्रिया
भारतीय संविधानातील सातव्या परिशिष्ठामधील राज्यसुचीमध्ये जमीन हा विषय राज्याच्या यादीत दिला आहे. त्यामुळे जमिनीला जोडून असणारे सर्व अधिकार हे राज्याकडे येतात. राज्य ते आपल्या महसुली अधिकारांतर्गत त्याचा वापर करते.
राज्याला जरी अधिकार असले तरी केंद्राने १९५३ साली एक मार्गदर्शक तत्व जारी करुन एक मर्यादा घातली आहे. या मार्गदर्शक तत्वामध्ये एखाद्या शहराचं किंवा गावाचं नाव बदलण्यासाठी काय करावे याची एक सविस्तर प्रक्रिया ठरवून दिली आहे.
राज्यांने प्रस्ताव संमत करावा. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवावा लागतो. राज्य सरकारने ठराव मंजूर करुन पाठवला तर केंद्र सरकार हे गृहित धरत की ‘राज्य सरकारने सर्व लोकमताचा विचार विनीमय घेवून, इतर संबंधित संस्थांची परवानगी घेवून (नगरपालिका, महानगरपालिका) हा प्रस्ताव पाठवला आहे.
केंद्र सरकार नाव बदलण्याशी संबंधित केंद्रातील सर्व संस्थांशी (उदा: सर्वेअर जनरल ऑफ इंडिया) चर्चा केल्यानंतर हा प्रस्ताव योग्य आहे किंवा नाही याची शहानिशा केली जाते.
गृहमंत्रालयाने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र जारी केलं तर आणि तरचं राज्य सरकारला नाव बदलता येत.