
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणावर महागाई वाढत आहे.यामुळे याची झळ सर्वसामान्य लोकांना बसत आहे.यामुळे सरकारविरोधात नाराजी असतांना आता तर रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी लागणारे रक्तही बाटलीमागे १०० रुपयांनी महागणार आहे.सध्या स्वयंपाकाच्या गॅसपासून अन्नधान्य महाग झाले आहे.यामुळे सर्वसामान्य लोकांनी जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे.
राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने रक्ताची दरवाढ करण्याचे पत्रक नुकतेच राज्य रक्त संक्रमण परिषदेला पाठविले होते.त्यानंतर राज्य परिषदेने दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.यामुळे ही दरवाढ आता निश्चित मानली जात आहे.२०१४ नंतर प्रथमच दरवाढ होत आहे.रक्त आणि रक्त घटक यांच्याच किंमतीत १०० रुपयाने वाढ होणार आहे.तसेच आता जीएसटी परिषदेत देखील अनेक गोष्टी वाढवण्यात आल्या आहेत.यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान,प्लाझ्मा,प्लेट लेट्स आणि क्रायो यांच्या किमतीत वाढ होणार नाही.यामुळे आता खासगी रक्तपेढ्यांमधील एका बाटलीची किंमत १,५५० होणार आहे.तसेच राज्यात ३६३ रक्तपेढ्या,७६ रक्तपेढ्या सरकार व महापालिकेच्या,२८७ रक्तपेढ्या धर्मादाय आणि खासगी संस्थेच्या आहेत.अनेकदा हे रक्त मिळत नसल्याने रुग्णाचे जीव देखील गेल्याच्या घटना घडल्या आहेत.यामुळे याबाबत सरकारकडून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.