
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्याच्या भाजपा आमदार मेघना बोर्डीकर यांची पुण्यातील एका सायबर भामट्याकडून चक्क फसवणूक झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकार पक्षाच्याच चार महिला आमदारांची फसवणूक झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जेथे आमदारांचीच या राज्यात फसवणूक होतेय तेथे सर्वसामान्य नागरिकांचे काय ? हा खरा सवाल आहे.
पुण्यातील भाजपाच्या श्वेता महाले, देवयानी फरांदे, माधूरी मिसाळ आणि जिंतूरच्या मेघना बोर्डीकर या चार महिला आमदार पूण्यातील एका सायबर मध्ये गेल्या असता तेथे सायबर भामटा मुकेश राठोड याने आई आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळली असावी असा कयास आहे अन्यथा छोटी किंवा मामुली रक्कम किंवा एखादी वस्तूही मागीतली असती तर या आमदारांनी एवढा मोठा बाऊ केलाच नसता. एक नाही तर चक्क चार महिला आमदार आणि त्याही राज्य व केंद्रात सरकार असलेल्या भाजपाच्या आहेत, त्यामुळे अधिकच आश्चर्य व्यक्त केले जाणे स्वाभाविक आहे.
या चारही महिला आमदारांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन आमची फसवणूक झाल्याचे सांगत सायबर भामटा मुकेश राठोड याच्या विरोधात गुन्हा नोंदविला असल्याचे समजते. त्यामुळे पुण्याचा हा सायबर भामटा पोलिसांना मात्र आव्हान ठरला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आ………………..,…………………,…………………..आणि जिंतूरच्या आ. मेघना बोर्डीकर या चौघी मिळून पूणे येथील एका सायबर मध्ये गेल्या असता तेथे त्यांची एका भामट्याने चक्क फसवणूक केल्याचे बोललेजात आहे.