
दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलझळके लोहा तहसिलदार व्यंकटेश मुंढे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अतिवृष्टीमुळे नदी नाले , तुडुंब भरून शेतातील पिके वाहून गेली तर काही पिके पिवळी पडुन जाग्यावरच करपुन गेली. दरम्यान लोहा तालुक्यात संततधार पाऊस चालू असल्याने व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी नाल्यांच्या बाजुने असलेल्या जमिनीचे अतोनात नुकसान झाले आहे याची तत्काळ शासनाने दखल घ्यावी व पंचनाम्यात वेळ न घालवता तात्काळ लोहा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार इतकी मदत द्यावी अशी मागणी शासनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलझळके यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतांना बालाजी कापसे , शंकर राठोड , बबन लुटे , अजीम शेख , दादाराव सोळंके , बबलू जाधव इत्यादी शेतकरी उपस्थित होते.