
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी,– प्रकाश केंद्रे
चोंडी साठवण तलावात मागील काही दिवसापासून सातत्यानी पाऊस चालु होता या पाऊसामुळे तलाव पूर्ण भरला असून तलावाचे काम निकृष्ठ झाल्यामुळे काही ठिकाणी तलाव लिकेज झाला आहे आणि भेगा पडल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालु आहे. गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे या मुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेत अनेकांनीआपले घरदार सोडून आसरा घेतला आहे.ही गंभीर बाब समजताच राहुल केंद्रे यांनी तात्काळ तलावला भेट दिली,काही दलित वस्तीतील घरानचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून यांचे पंचनामे करावेत अश्या सूचना उपजिल्हाधिकारी यांना केल्या.सरकार कडून सर्वोतोपरी मदत करू असे आश्वासन दिले आणि यां वेळी उपाजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, कार्यकारी अभियंता काळे,मा.सभापती विजयकुमार पाटील प्रा.बालाजीराव मुंडे, सागर बिरादार,भीमा पाटील, चिट्टे सावकारआदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.