
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी – माधव गोटमवाड
कोवीड साथरोग काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कंधार तालुक्यातील पहिला कोरोना संशयित रुग्ण शोधण्यासाठी रात्री अंधारात जावून आपला जीव धोक्यात घालून त्या कोरोना सदृश महिला रुंग्णाचा जीव वाचविण्यासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल तसेच कंधार तालुका प्रशासन व सार्वजनिक आरोग्यसेवेच्या खांद्याला खांदा लावून लढणारे कंधार येथील श्री.सद्गुरू हाँस्पिटल चे संचालक डॉ.प्रदीपसिंह राजपूत यांचा कोवीड योद्धा म्हणून फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
कलापुष्प प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा टेळकी येथील कै.राजाराम देशमुख विद्यालयाचे कलाशिक्षक सदाशिव गायकवाड यांनी
डॉ.प्रदीपसिंह राजपूत यांचा यथोचित सत्कार केला.
हा सत्कार सोहळा कंधार येथील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुडमेवार यांच्या सुमन हाँस्पिटलमधे हा सत्कार सोहळा दि.२० जुलै २०२२ रोजीआयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी कंधार डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष तथा बालरोगतज्ज्ञ डॉ.संजय केंद्रे,माजीअध्यक्ष तथा स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. भगवानराव जाधव,ह्रदयरोगतज्ञ डॉ. केंद्रे, तसेच डॉ. दिपक बडवणे,डॉ. दिनकर जायभाये,डॉ. रामभाऊ तायडे,डॉ.राजेश्वर पांचाळ, डॉ. प्रवीण जाधव
डॉ.डि.एल.गुडमेवार,डॉ.राम फुलवळे,आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्कार समारंभाचे आभार व्यक्त करतांना डॉ.राजपूत म्हणाले की,सदाशिव गायकवाड हे एक कलाशिक्षक आहेत,तरीही कंधार येथील कोविड योद्धा असलेल्या डॉक्टरांच्या कोवीड कार्याची दखल घ्यावी असे वाटले व त्यांनी आज फेटा बांधून आमचा सत्कार केला,कलाशिक्षक सदाशिव गायकवाड यांच्या कार्याची पोचपावती सांगतांना डॉ. राजपूत यांनी कलाशिक्षक सदाशिव गायकवाड यांनी एकेकाळी आपल्या रक्ताने पत्रलेखन केले,आपल्या रक्ताने चित्र रेखाटलेले आहे,पत्रकार म्हणून मी सदाशिव गायकवाड यांच्या रक्ताने लिहलेल्या पत्र व चित्राची बातमी लावली होती व ती बातमी महाराष्ट्र भर गाजली होती,त्या बातमीची दखल मला राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळाला होता,वास्तविक असे होते की,आपल्या रक्ताने पत्र लिहिले होते सदाशिव गायकवाड यांनी व ती बातमी छापल्या बद्दल मला पुरस्कार मिळाला होता या घटनेचा उलगडा या प्रसंगी आभार व्यक्त करतांना डॉ. राजपूत करुन दिला. या समयी उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर आज योगायोगाने कलाशिक्षक सदाशिव गायकवाड यांचा वाढदिवस असल्याने कंधार डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सदाशिव गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले.