
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई | एकनाथ शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपत्रातेबाबतचा निर्णय पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी ठेवली आहे.
यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीये. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इतक्या लवकर राजीनामा द्यायला नको होता. त्यांनी राजीनामा देऊन फार मोठी चूक केली आहे. आपलं मत त्यांनी विधानसभेत जाऊन मांडायला हवं होतं. आपलं मत काय, काय परिस्थिती झाली, काय आरोप झाले या सगळ्या गोष्टी अधिकृतपणेे त्यांनी सदनात सांगायला हव्या होत्या, अशी प्रतिक्रिया आजच्या सुनावणीवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला नसता तर बहुमत चाचणीवेळी त्याचा उपयोग झाला असता. विरोधकांनी विरोधात मतदान केल्यानं अँन्टी डिफेक्शन लाॅ-10 लागू झाला असता. या कायद्याप्रमाणे ज्यांनी ठाकरेंच्या विरोधात मतदान केलं ते सगळे अपात्र झाले असते, मात्र त्यांनी आधीच तलवार म्यान करून ठेवली होती. त्यामुळे राज्यपालांनी असा निर्णय दिला. यामुळे हे प्रकरण जास्त इंटरेस्टिंग झालं आहे, असंही ते म्हणाले
आज निर्णय होईल अशी अपेक्षा होती मात्र तसं काही घडल नाही. पक्षातर कायद्याचं निश्चितपणे उल्लघनं झालं आहे. त्यामुळे त्या नेत्यांचं निलंबन होणं गरजेचं आहे. ही बाजू खूप गुतांगुतीची असल्याने न्यायालयाला विचार करून अभ्यास करुन निर्णय द्यावा लागेल, असही वक्तव्य पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलंय.