
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा :दि. १९. हिंगणा इसापूर येथील प्राथमीक शाळेवर दोन शिक्षक होते. परंतु मागिल काही दिवसापासून वर्ग पाच व एकच शिक्षक आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान होत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शिक्षक देण्याकरीता हिंगणा इसापूर येथील नागरिकांनी दि.१९ जुलैला गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदुरा यांना लेखी निवेदन दिले. पंधरा दिवसांच्या आंत शिक्षक देण्यात यावा. अन्यथा आपल्या कार्यालयातच मुलांना घेऊन शाळा भरविण्यात असेही निवेदनात म्हटले आहे. ह्या निवेदनावर अजाबराव गाडे, विनोद अवचार, सोपान अवचार, उमेश वाघ, किशोर गाडे,धम्मपाल गाडे, कडु गाडे, संजय गाडे, पुरूषोत्तम झाल्टे, संदिप देशमुख, प्रदिप देवकर, मिलींद गाडे इत्यादीच्या सह्या आहेत.