
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- महानगरपालिका कडून अतिक्रमण मोहीम युद्ध स्तरावर राबविण्यात येत आहे.गुरुवारी अमरावती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पंचवटी ते शेगाव नाका परिसरात अतिक्रमणावर कारवाई करून व्यावसायिकांचे साहित्य जप्त केले.या कारवाईमूळे अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले आहे.
काही ठिकाणे गर्दीमुळे शहरातील वाहतूकीस अळथळा निर्माण होत असल्याने महापालिकेने गुरुवारी पंचवटी चौक ते शेगाव रोडवरील अतिक्रमण कारवाई करण्यात आली.तसेच विलासनगर रोडवरील दोन्ही बाजूंनी असलेले अतिक्रमण काढण्यात आले.सदर अतिक्रमण निर्मूलन व अनधिकृत बांधकाम पडण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली.या कारवाई मध्ये वॉल कंपाऊंड,टिन पत्र्याचे बांधकाम,पान टपऱ्या,दुकाने,अनधिकृत दुकाने,पोस्टर,बॅनर इ.मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात आले.म.न.पा. आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्या आदेशान्वये शहरातील अनधिकृत बांधकाम आणि वाहतुक कोंडी निर्माण करणाऱ्या अतिक्रमणावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली.सदर कारवाई दरम्यान अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्सले,उपअभियंता प्रमोद इंगोले,अतिक्रमण विभागाची टीम व पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.