
दैनिक चालु वार्ता लोहा.(ता.प्र.) भरत पवार …
लोहा तालुक्यातील मौजे कलंबर (बु.) येथील भिमक्रांतीनगर चा विजपुरवठा तांत्रीक अडचणीमुळे गेल्या एक महीण्यापासुन बंद होता. व महावितरणचे उपकार्यकारी अभियंता जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत होते त्यामुळे कलंबर (बु.) येथील भिमक्रांतीनगर चा विजपुरवठा तात्काळ सुरु करण्यात यावा यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे,मराठवाडा सदस्य अनिलदादा गायकवाड,मराठवाडा उपाध्यक्ष मधुकरराव झगडे,वंचितचे नेते के. एच. वन्ने, दक्षीण जिल्हाउपाध्यक्ष प्रदिपभाऊ मगरे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालया समोर तिव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले.व यावेळी आंदोलनातील आंदोलनकर्त्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आणी महावितरणचे सहाय्यक अभियंता श्री. वाघमारे यांनी मोर्चेक-यांना विजपुरवठा आजच चालु करण्याचे आश्वासन देउन आंदोलकांचे मागण्यांचे निवेदन स्वीकारले आहे. या ठिय्या आंदोलनात लोहा तालुकाध्यक्ष सुनिल बोईनवाड,लोहा महीला आघाडी तालुकाध्यक्षा शांताबाई लांडगे,घंटेवाड, अश्वीन गर्दनमारे,विलास मगरे,कौशल्याबाई सोनसळे,जगदीश हनवते,अनिल सोनसळे,गोविंद हनवते,राहुल सोनसळे,अक्षय सोनसळे,विजय सोनसळे,दिपक सोनसळे,सुशिल बनसोडे, आदींची उपस्थीती होती.