
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
भिगवण : दिनांक. २२/०७/२०२२ रोजी १७:२० वा चे सुमारास मौजे भिगवण, ता. इंदापुर, जि. पुणे गावचे हददीत आनंद हॉटेल मध्ये इसम नामे १) नामदेव बाळासो बंडगर वय ४० वर्षे, रा. मदनवाडी, ता. इंदापुर, जि. पुणे, २) गजानन लक्ष्मण ठाकुर, वय २४ वर्षे, सध्या रा. आनंद हॉटेल, भिगवण, ता. इंदापुर, जि. पुणे, मुळ रा. गंगाखेड, जि परभणी हे सदरचे हॉटेलमध्ये महीला यांचे मार्फतीने स्वताचे आर्थिक फायदया करीता वैश्या व्यवसाय करीत आहेत अशी माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर हॉटेलमध्ये तीन महीला मिळुन आल्या.
त्यांचेकडे अधिक विचापुस करता त्यांनी इसम नामे १) नामदेव बाळासो बंडगर, २) गजानन लक्ष्मण ठाकुर हे आमच्या कडुन वेश्यागमनाचा व्यवसाय करून घेवून त्यांना अनैतिक व्यापार करणेस प्रोत्साहन देतात. म्हणुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करून भिगवण पोलीस स्टेशन, गुन्हा रजि. नंबर १८८/२०२२ स्त्रीया व मुली अनैतिक
व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६, ७ प्रमाणे दिनांक २२/०७/२०२२ रोजी गुन्हा दाखल केला.
यातील आरोपी नामे २) गजानन लक्ष्मण ठाकुर, वय २४ वर्षे, सध्या. रा. आनंद हॉटेल, भिगवण, ता. इंदापुर, जि. पुणे, मुळ रा. गंगाखेड, जि परभणी, यास दिनांक २२/०७/२०२२ रोजी २०:५० वा सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा तपास चालू आहे.
देशमुख सो, पोलीस अधीक्षक, पु ग्रामीण, मा. मिलींद मोहीते सो, अप पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पु ग्रामीण, मा. गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधीकारी बारामती विभाग, यांचे मार्गदर्शनाखाल दिलीप पवार, सहा पोलीस निरीक्षक भिगवण पो.स्टे, भिगवण पो.स्टे पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम पोलीस अंमलदार इन्कलाब पठाण, महे उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी महीला पोलीस अंमलदार प्रिया पवा यांनी केली आहे.