
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी वाडा तालुका-मनिषा भालेराव
वाडा तालुक्यातील कोणे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच अश्विनी मोरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या राजमाता जिजाऊ समाज ग्रुप तर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थी चेतन मोरे हा इयत्ता १० वी मध्ये ८२ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या बद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते संजय हरड व बाळाराम हरड यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमोद दळवी, दिनेश सरडे, गणेश मोरे, सुनिल म्हस्कर हे ग्रुप सदस्य तर रवींद्र कदम, सुनिल म्हस्कर, गणेश मोरे हे गावकरी उपस्थित होते.
तर कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून तानाजी कदम ,राकेश हरल,मनोज गवाले, शंकर हरल वसई विरार महानगर पालिका कर्मचारी, किरण मरले माथाडी युनियन अध्यक्ष व दिलीप पालव Lic officer ठाणे यांनी सहकार्य केले.
समाजातील विध्यार्थी मित्रांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील अत्यंत गरजूंना सहकार्य करण्यासाठी आमचा पूर्ण ग्रुप पुढाकार घेत असल्याचे मत विनोद म्हस्कर यांनी व्यक्त केले.