
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:भाजप वर्तुळात प्रचंड दमछाक होत असल्याने माजी आ. सुभाष साबणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याची चिन्हे असून त्यानंतरच त्यांच राजकिय पुनर्वसन होईल असे मानले जाते.
अनुक्रमे मुखेड तसेच देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातून असे तीन वेळा सुभाषराव साबणे यांनी विधानसभेत नेतृत्व केले, जून्या काळातील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेनंतर सेना आमदारांनी सभागृह डोक्यावर घेऊन हंगामा केला, या घटनेनंतर तत्कालीन सरकारने काही आमदारांना निलंबीत केले, त्यात साबणेंचा समावेश होता. राज्यात तीन दशकात अनेक सत्तांतर झाली. कधी सत्तेत तर कधी विरोधात असूनही सुभाषराव यांनी शिवसेना सोडली नाही. हे त्यांच्या सुनबाईचे राजकिय पदार्पनही शिवसेनेच्या • धनुष्यबाणामुळेच जिल्हा परिषदेत आगमन झालेमतदार संघात प्रचंड प्रक्षोभ निर्माण झाला, त्याचे प्रतिबिंब मत पेटीतून उमटले. मोठ्या फरकाने दिबंगत नेते रावसाहेब अंतापुरकर निवडून आले. कुणाच्या ध्यानी मनी नसताना राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच सरकार आले. सत्ता काळात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साबणेंकडे लक्षच दिले नाही. अशा परिस्थितीत मात्र आताचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी साबणेंना वेळोवेळी दिलासा आणि आर्थिक मदतही केली, असे सांगितले जाते. साबणेचे नाव मतदार संघात चर्चेत राहवे यासाठी शिंदे यांनी ठाणे जिल्हयातील एका चॅरिटेबल ट्रस्टकडून दोन अद्यावयत रूग्णवाहीका दिल्या. सर्वच ‘मविआ’ तील घटक पक्षातील नेत्यांना ताकत देण्यात येत होती. नांदेड जिल्हयात मात्र माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून पदोपदी कुचंबना आणि अपमानाचे सत्र सुरु होते. रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली. २०१९ मध्ये ही जागा शिवसेनेकडे होती. मुख्यमंत्र्यांनी आपला विशेषाधिकार वापरून पुनः ही जागा सेनेला घेणे अपेक्षीत होते परंतू तसे झाले नाही. या सर्वघटनांचा पारा तेव्हाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या काळात ते आमदार होते. सत्ताधारी आमदार यांच्यासमोर वाचल्यानंतर शिंदे यांनीच साबणेंना ‘भाजप’ म्हणून त्यांची चलती होती. सत्ता आणि त्यातून मध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. बहुदा आताच्या पैसा हाच मुलमंत्र साबणे यांनी जपला, परिणाम उठावाची सुरुवातच झाली.