
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : नांदेडहून व्हाया परभणी पनवेल येथे जाणारी एक्स्प्रेस आगामी ५ ते ८ ऑगस्ट दरम्यान कुर्डूवाडी स्थानकापर्यंतच धावणार आहे.
परभणी जिल्हा व लगतच्या परिसरातील जे प्रवासी पनवेल येथे जाणार असतील त्यांच्यासाठी ही माहिती महत्वाची मानली जात आहे. अतिमहत्वाचे काम किंवा जाणे. आवश्यकच आहे, अशा प्रवाश्यांना कुर्डूवाडी स्थानकापासून पनवेल पर्यंत किंवा पुढे मधल्या कोणत्याही स्थानकापर्यंत जाणे असेल तर पर्यायी व्यवस्था काय असू शकेल याचीही चौकशी अगोदरच करणे सोईचे व्हावे यासाठी हे वृत्त महत्वाचे आहे.
कुर्डूवाडी ते दौंड दरम्यान पटरी व्यवस्थापन आणि अन्य कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे सदरची एक्स्प्रेस आगामी ५ ते ८ दरम्यान अशी सलग पाच दिवस पनवेल पर्यंत न जाता ती कुर्डूवाडी स्थानकापर्यंतच नेली जाणार आहे. तरी अन्य प्रवाशांबरोबर दै. चालू वार्ता चे वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतक यांनीही बदललेल्या या वेळेची अगोदरच नोंद घेतली तर पुढे होणारा त्रास वाचवता येईल.