
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पेठवडज -बाजीराव गायकवाड
भोपाळवाडी:- बळीराम पाटील प्राथमिक शाळा भोपाळवाडी या शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. साहित्यातून उपेक्षितांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करणारे व शोषितांचा आक्रोश शब्दांतुन मांडणारे,थोर साहित्यिक,चित्रपट दिग्दर्शक व संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे लढवय्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व समाजसुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.तसेच या थोर नेत्यांच्या जयंतीचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून दोन्ही नेत्यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली.