
दैनिक चालू वार्ता परभणी प्रतिनिधी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : देवदशनाहून परतणा-या भाविकांवर काळाने घाला घातला असून त्यात पती-पत्नीसह एकजण असे तीन जण जागीच ठार झाले आहेत. या दु:खद घटनेमुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनूरी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
तिरुपती येथील बालाजीचे दर्शन झाल्यावर आत्मापूर येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी जाणारे हिंगोली जिल्हा, कळमनूरी तालुक्यातील डोंगरकडा येथील पती-पत्नीसह एकजण जागीच ठार झाले आहेत तर बाकीचे गंभीर जखमी भाविक भक्तांना कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बंगळूर महामार्गावरील चित्रदुर्ग, जिल्हा कर्नाटक येथे भरदुपारी झालेल्या अपघातात वाहनांची टक्कर होऊन बरेच नुकसान झाले आहे. कळमनूरी तालुक्यातील डोंगरकडा गावचे भाविकांवर घातलेल्या काळाच्या झडपेत जो दुर्दैवी प्रकार घडला आहे त्यामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. मध्यान्हाची वेळ असल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याचे बोलले जात आहे. छोटी भूल, बडी भूल होती है, असे फलक जागोजागी लावलेले असतात, वेगावर नियंत्रण ठेऊन वाहन चालवण्याऐवजी किंवा चालकाला थोडी विश्रांती देण्याऐवजी सतत चालविलेल्या वाहनांचा असा आघात झाला, हे मुळीच विसरुन चालणारे नाही.