
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
वेळ प्रसंगी स्वतः च्या पोटाला चिमटा घेऊन कुटुंबातील सदस्यांच्या सर्व मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करून वेळ प्रसंगी अवहेलना वाटयला आली तरी हार मानता कणखर बाण्याने उभा राहुन खडतर असं पद कुटुंब प्रमुख जबाबदारी ने पार पाडताना इतरांच्या आनंदात समाधान मारणारा , कुटुंब प्रमुख एकेकाळी खुप प्रसिद्ध आणि प्रचलित होते .परंतु सध्याच्या काळात हे कुटुंब प्रमुख नाव पद जबाबदारी आणि कर्तव्य सगळं नामशेष होण्याच्या मार्गावर आहे . कारण कुटुंब व्यवस्था च जवळपास संपुष्टात आलीय . पण काही वर्ष पुर्व मात्र दोन दोन तीन पिढ्या एकत्र असल्याच्या मी पाहिलंय आणि या सगळ्या मध्ये तुझं माझं न करता सख्खे भाऊ अगदी चुलत भाऊ ,पुतणे असा मला मोठा गाडा कोणाच्याही बाबतीत दुजा भाव न करता कुटुंब प्रमुख एकेकाळी चालवत ति वेळ तो काळ अगदी वेगळच पाहटे सकाळी लवकर उठुण , घरातील सगळ्यांना वेळेवर उठवणारे
रात्री वेळेवर झोपुन , अगदी सगळ्यांच्या झोपीवर लक्ष ठेवून असणारे पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे,फुलं केवळ देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे, दिवसभरात किमान एकदातरी मंदिरात एखादी फेरी मारणारे,
रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे,
दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे, अगदी सौजन्याशिल आचरणातून प्रत्येकाच्या मनात एक वेगळीच अस्था निर्माण करणारे ,
अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करण्याची सुचना देवुन लक्ष देणारे परंतु उपाशी पोटी कोणीही राहणार नाही याची दक्षता घेणारे व शेवटी उरले तर गोर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे, अगदी साधं सरळ रांगडा व्यक्तीमत्व तसेच पाहुणे-रावळे आल्यानंतर स्वतःची प्रचंड गैरसोय असूनही पाहुणचार मध्ये कुठेही कमी पडणार नाहीत याची यथोचित काळजी घेणारे करणारे, सन उत्सव असताना सगळ्यांना कपडे लते सोय करणारे स्वतः अगदी दर्शक असल्यासारखे राहुन सगळ्यांच्या उपस्थिती मध्ये आपापले सण धांगडधिंगा न करता कुठलाही बडेजाव, दिखावा न करता अत्यंत साधेपणे साजरे करणारे, तसेच सार्वजनिक जीवनात स्वतः कुठलही व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीती बाळगणारे,एक जबाबदार सुजनशिल ,
जुना झालेला चष्मा तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे,एक पात्र कुटुंब प्रमुख फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे,खिशातला पैसा जपून वापरणारे आणि शक्यतो घरीच साधे व चविष्ट जेवणारे हि लोक सध्याच्या काळात हळुहळु कमी होऊन नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत उर्वरित नाममात्र
लोक आता हळूहळू हे जग सोडून चालले आहेत. ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबर जाईल.आणी ती शिकवण म्हणजे
“समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं.. जीवन जगायचं असतं..!'” ही शिकवण जगातून नाहीशी होईल. या मध्ये काही शंका नाही . तदनंतर शिल्लक काय तर फक्त स्वार्थ, अविश्वास, चैन, असंवेदनशील मने, भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रिम अगत्य व अर्थहीन शुभेच्छा
गणेश खाडे
संस्थापक वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301