
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी
कराड. चायना बनावटीचे पिस्तूल बेकायदेशीररित्या बाळगल्या प्रकरणी दोन युवकांना तळबीड पोलिसांनी ताब्यांत घेवुन अटक केली ही कारवाई बेलवडे हवेली ता. कराड येथे तळबीड पोलीस ठाण्यांच्या पथकांने सोमवारी सायंकाळी धडाकेबाज कारवाई केली. यामध्ये योगेश अंकुश पवार वय ३७ ) व समाधान जालिंदर देशमुख वय १९ दोघेही रा. बेलवडे हवेली ) अशी अटक करण्यांत आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी कारवाई करण्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल यांनी जिल्ह्यांतील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत या आदेशानुसार तळबीड पोलीस यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रांत तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील सहाय्यक फौजदार सूर्यकांत देशमुख पोलीस नाईक संदेश दीक्षित कॉन्स्टेबल प्रवीण फडतरे कॉन्स्टेबल निलेश विभुते यांचे पथक कार्यरत आहे. विभागांत तपास करीत असताना बेलवडे हवेली येथे दोन युवकांकडे पिस्तूल असल्यांची माहिती या पथकांला मिळाली त्यानुसार पथकांने माहितीची खतरजमा करुन सोमवारी सायंकाळी गावात छापा टाकला. संबंधित दोन्ही युवकांना ताब्यांत घेवुन त्यांची झेडती घेतली असता त्यांच्याकडे चायना बनावटीचे पिस्तूल आढळून आले संबंधित पिस्तुलाची किंमत सुमारे ५० हजार रुपये असून पोलिसांनी ते जप्त केले आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील व सहाय्यक फौजदार मुळीक अधिक तपास करीत आहेत सदरच्या कारवाईमध्ये तळबीड पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.