
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
औरंगाबाद– पुणे महामार्गावरील भेंडाळा फाट्याजवळ ट्रक-मोटरसायकलच्या अपघातात दोन विद्यार्थी ठार झाल्याची घटना समोर आली आहे. हैद्राबादला जाणाऱ्या ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत या दोन्ही तरुणांचा जगीच मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे अपघात मृत्यू झालेले हे दोन्ही मित्र एकाच गावातील असून, लहानपणीचे वर्गमित्र असल्याचे सुद्धा समोर आले आहे. आदीत्य रामनाथ सुंब (वय 20, रा, मांजरी ता. गंगापूर) आणि यश उर्फ नयन भाऊसाहेब शेंगुळे (वय 20, रा, मांजरी ता. गंगापूर) असे या दोन्ही तरुणांचे नाव आहे.