
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांच्यावर राजकीय आकसातून ईडीने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ आजही राज्यसभेत गदारोळ झाला. शिवसेना खासदारांसह विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे राज्यसभेचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करावे लागले.
त्यानंतर सभागृहात महागाईवर चर्चा झाली.
राज्यसभेचे कामकाज सुरू होताच नवनिर्वाचित सदस्यांना शपथविधीसाठी सभापतींनी पाचारण केले, मात्र त्याचवेळी शिवसेना खासदार अनिल देसाई व प्रियंका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यांना इतरही विरोधी पक्षाच्या खासदारांनी पाठिंबा दिला. या गोंधळातच नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारनंतर राज्यसभेत महागाईवर चर्चा झाली. लोकसभेतही तपास यंत्रणांच्या गैरवापराच्या मुद्दय़ावरून गदारोळ झाला.