
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा -संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे माजी कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी शेखर सिंह यावेळी बोलताना पुढे म्हणाले नोकरीच्या निमिंत्ताने आत्तापर्यंत अनेक ठिकाणी काम केले पण, सातारकरांनी दिलेला जिव्हाळा आणि प्रेम कुठेच अनुभवायला मिळाले नाही तसेच मला माझ्या प्रशासन विभागांनेही मला चांगले सहकार्य केले मी त्यांचाही ऋणी आहे असे आपले मत मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निरोप समारंभांच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे सातारा जिल्हा प्रशासनाकडूंन स्वागत करण्यांत आले. यावेळी शेखर सिंह म्हणाले कोरोना संकट काळात सर्वच शासकीय विभागांने समन्वयांने काम केले पण त्याचबरोबर क्रेडाई सातारा यांचे मला चांगलेच योगदान महत्त्वांचे ठरले. विशेषता जंबो कोविड सेंटर उभारण्यांमधील क्रेडाईचे योगदान अभूतपूर्व असे आहे अतिदृष्टीच्या काळातील सहकार्य मोलाचे ठरले. त्यामुळे सातारा जिल्ह्यांत पर्यटन रोजगार निर्मिती तसेच इतर कामाबाबत क्रेडाईने केलेल्या मदतीमुळे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवू शकलो. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष सुधीर शिंदे पुढे म्हणाले जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आरोग्य पर्यटन क्रीडा संस्कृतीमध्ये अत्यंत चांगलेच काम केले तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडविल्या त्यामुळे जिल्ह्यांला मिळालेले ते कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी होते. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे कोरोना काळातील केलेल्या कामगिरीबद्दलच नव्हे तर जिल्ह्यांच्या संपूर्ण गेले अडीच वर्षापासून केलेल्या कामाची आठवण जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची सातारकरांना नव्हे तर सातारा जिल्हा प्रशासन विभागांमध्ये विभागांत कायम त्यांची आठवण नक्कीच राहील.