
दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटील
आरोपीला वाळूज येथील सासऱ्याच्या घरातून शिल्लेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात…..
गंगापूर हर्सूल
कारागृहात रवानगी करण्यासाठी नेत असताना एस. क्लबजवळ एका आरोपीने मला उलटी होत आहे सांगितले त्या आरोपीला गाडीच्या खाली उतरविले असता अंधाराचा फायदा घेत आरोपी बेड्यासह पसार झाला होता , प्रविण राऊत (रा महेबुबखेडा,ह मु वाळुज एम आय डी सी) असे पसार आरोपीचे नाव आहे त्याच्यावर गु.र. नंबर 259/2022 भा.द.वी.कलम 379,411,34 अन्वये गुन्हा दाखल आहे त्यास शिल्लेगाव पोलिसांनी गंगापूर न्यायालयात हजर केले असता एम.सी.आर झाल्याने त्यास शिल्लेगाव पोलीस हर्सूल कारागृहात पोलीस वाहनाने सोडन्यास जात असताना सदर प्रकार घडला होता त्यामुळे शिल्लेगाव पोलिसांपुढे बेड्यासह फरार झालेला आरोपी पकडण्याचं आव्हान दत्त बनून उभे ठाकले होते त्यामुळे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनखली गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यावरून औरंगाबाद/नगर रस्त्यावरील वाळूजच्या मच्छीमार्केटच्या विरुद्ध असलेल्या एका घरातून आरोपीला पोलीस अंमलदार सुनिल सोनवणे वं बिट अंमलदार तात्याराव बेदरे, राजेंद्र निसर्गे, अनंत गुढे, बाबा शेख यानी ताब्यात घेतले असून हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.