
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
इसबपुर(नांदुरा):–दि ४. इसबपूर (सोनज) येथील गाव वस्तीतील विद्युत खांब हा गेली अनेक दिवसांपासून खराब झालेला असल्यामुळे ग्रामपंचायत इसबपूर(सोनज) यांनी वारंवार तक्रार करूनही सदर विद्युत खांबाचे विद्युत कर्मचाऱ्यांनी काम केले नाही. आज दि. ०४/०८/२०२२ रोजी सदर विद्युत पोल विश्वासराव देशमुख यांच्या राहत्या घरावर कोसळला. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. अश्याप्रकरचे गावांमध्ये ८ ते १० विद्युत खांब अशा रीतीने पावसाच्या पाण्यामुळे खराब झालेले आहेत. तरी विद्युत महावितरणने दुर्लक्षित केलेल्या या विद्युत खांबाची कामे लवकरात लवकर करून जीवितहानी व वित्तहानी टाळावी.
विद्युत वितरण कंपनी नायगाव येथे ग्रामपंचायत इसबपूर यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे दोन , तीन वेळेस लेखी तक्रार व निवेदन देऊनही विद्युत वितरण कर्मचाऱ्यांनी साफ दुर्लक्ष करून विद्युत खांबाचे दुरुस्तीचे काम केले नाही. त्यामुळेच गावामध्ये अशा प्रकारची ८ते १० विद्युत खांब पावसामुळे खराब होऊन एकीकडे झुकत आहे. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. नागरिकांनी याविषयी अनेकदा तक्रार करूनही विद्युत कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत? आणि अशातच कुणाची जीवितहानी व वित्तहानी झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. हे काम लवकरात लवकर करून जीवित, वित्तहानी टाळावी, अन्यथा मोठा अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदार ही विद्युत वितरण कंपनीच राहील? असे गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले.