दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमीत्त सप्तगिरी पोदार लर्न स्कूल विद्यार्थी परिषद निवडणूक (स्टूडंट्स कौन्सील इलेक्शन) 2022-23 घेण्यात आले
सप्तगिरी पोदार लर्न स्कूल देगलूर या शाळेत भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमीत्त विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागरूक करणे व समाजप्रबोधन करण्याचे काम हे शालेय जिवनातून घडविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विविध पदासाठी प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडणूक घेण्यात आलेली असून त्यात स्कूल हेड बॉय, स्कूल हेड गर्ल, डेप्युटी हेड बॉय, डेप्युटी हेड गर्ल, स्पोर्ट कॅप्टन बॉय, स्पोर्ट कॅप्टन गर्ल असे अनेक पदे असून त्यांना मतदानाची प्रक्रिया माहिती करून देऊन त्यांचे फॉर्म भरणे, प्रचार करणे, मतदान करण्यासाठी त्यांची नियमावली याची संपूर्ण माहिती देऊन, प्रचार करण्यासाठी मुलांना एका दिवसातील शेवटच्या तासीकामध्ये वेळ देण्यात आलेला होता.
त्यासाठी विद्याथ्यांना निवडणूक चिन्ह वाटप करणे, बॅलेट पेपर तयार करणे, मतदारांच्या बोटाला शाई लावणे आणि
बॅलेट पेपर वर चिन्हाच्या समोर शिक्का मारून, बॅलेट पेपर हे मतदान पेटीमध्ये टाकून बंद करण्यापर्यंतचे प्रशिक्षण देण्यात
आले.
यासाठी निवडणूक अधिकारी म्हणून शाळेचे प्राचार्य श्री दिगंबर शेकापूरे सर व सांस्कृतीक विभाग प्रमुख जयश्री चिनुरकर मॅडम यांनी सर्व मुलांना निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. या निवडणूकीसाठी शाळेतील वर्ग 3 री ते 10 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना मतदानाचा हक्क देण्यात आला. दि. 03.08.2022 रोजी स्टूडंट्स कॉन्सील इलेक्शन 2022-23 मधील विद्यार्थ्यांनी अतीशय उत्स्फुर्तपणे
मतदानाचा हक्क बजावला. दि. 04.08.2022 रोजी वेळ दुपारी 3.00 वा. मतमोजणीला सुरूवात झाली एकूण चार फेच्या
ठेवण्यात आले. सायंकाळी 6.00 वाजता निवडणूकीचा निकाल खालील प्रमाणे आहे.
स्कूल हेड बॉय
कृष्णा गुरुडे
५३० माता पैकी ३४० मते मिळाले
स्कूल हेड गर्ल
स्नेहा बंडे
५३० मता पैकी ३४० मिळाले.
डेप्युटी हेड बॉय
ऋषीकेश रकटे ४९३पैकी २१२ मिळाले.
डेप्युटी हेड गर्ल
साक्षी घोडके ५३३पैकि ११६ मिळाले.
स्पोर्ट कॅप्टन बॉय
रिशीत पंदीलवार ५२५पैकी २२८ मिळाले.
स्पोर्ट कॅप्टन गर्ल
श्रावणी अमृतवार ५२५पैकी १७८ मिळाले.
वरील सर्व विजयी उमेदवारांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या सर्व प्रक्रियेसाठी शाळेतील शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेही मोलाचे योगदान व मार्गदर्शन लाभले आहे.
