
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
चाकुर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांची अवैध धंद्यावर कारवाई. देशी दारू सह 04 लाख 57 हजार रुपयाचं मुद्देमाल हस्तगत. 04 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी, चाकूर श्री.निकेतन कदम सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी पोलीस स्टेशन स्तरावर अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबवीत आहेत.
सदर मोहीम अंतर्गत सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम यांनी पथकातील पोलीस अधिकारी/अंमलदार यांना वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते. सदर पथक चाकूर उपविभागामधील अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना श्री. निकेतन कदम यांना गोपनीय माहिती मिळाली की,चाकूर पोलीस स्टेशन हद्दीतील नळेगाव शिवारातून एक कार मधून देशीदारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्याकरिता देशी दारूची वाहतूक करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर पथकाने दिनांक 04/08/2022 रोजी दुपारी दोन वाजण्याचे सुमारास निटूर ते नळेगाव जाणाऱ्या रोडवर सापळा लावला. बातमीप्रमाणे एक अल्टो कार येताना दिसली. त्या कारला थांबवून कारची झडती घेतली असता त्यामध्ये देशी दारूच्या 680 बाटल्या मिळून आल्या. त्यावरून कार मधील इसमाकडे विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
1) नवनाथ नारायण आदमाने, वय 31 वर्ष, राहणार नळेगाव.
2) लक्ष्मण केशव गंगणे, वय 35 वर्ष, राहणार- नळेगाव.
असे असल्याचे सांगून स्वतःच्या फायद्यासाठी देशी दारूची चोरटी विक्री व्यवसाय करण्याकरिता वाहतूक करीत असले बाबत सांगितले.
नमूद इसमाकडे विश्वासात घेऊन विचारपूस केली असता देशी दारूचा उरलेला देशी दारूचा माल नळेगाव येथील वैभव बार मध्ये लपवून ठेवलेला असल्याचे सांगितले. त्यावरून सदर पथकाने नळेगाव येथील संतोष गंगणे, राहणार उजेड हे चालवीत असलेले वैभव बार वर छापा मारला असता तेथे देशी दारूच्या 240 बाटल्या व दारूची चोरटी वाहतूक करण्याकरिता वापरण्यात येणारे बोलोरो कार मिळून आली. वैभव बार मधून देशी दारूचा विना पास परवाना चोरट्या विक्री व्यवसाय करणारे इसम नामे
2) संतोष गंगणे राहणार, उजेड
3) राम आदमाने राहणार, नळेगाव
अशाविरुद्ध 4 इसमा कडून देशी दारूच्या 920 बाटल्या व 2 वाहने असे एकूण 04 लाख 57 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
नमूद आरोपीचा विरुद्ध पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 275/2022 कलम 65 (अ) (ई) 81, 83 मुंबई दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यांचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री.निकेतन कदम यांचे नेतृत्वात पथकातील पोलीस अमलदार साहेबराव हाके, कलमे,राजेंद्र रायबोळे,पाराजी पुठ्ठेवाड योगेश मरपले यांनी केली आहे.