
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाजपाचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोहयात नगरसेवक करीम शेख मित्र मंडळाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
लोहा मतदार संघाचे भावी आमदार म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद सभापती तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाजपाचे युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांचा ४ आॅगस्ट रोजी वाढदिवस होता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा लोहा येथे नगरसेवक करीम शेख मित्र मंडळाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य सत्कार केला.
यावेळी नगरसेवक करीम शेख, सलीम शेख, पटेल शेख, अजमत शेख,यांच्या सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.