
दैनिक चालु वार्ता वडेपुरी प्रतिनिधी -मारोती कदम
कंधार लोहा तालुक्यातील युवकांचे प्रेरणास्थान असलेले युवा नेते माननीय प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांचा मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम साई सुभाष नांदेड येथे कौटुंबिक वातावरणात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब, प्रतिभाताई ,वैशालीताई ,प्रणिताताई,मायाताई, सोनालीताई, प्रणिताताई देवरेचिखलीकर , संदीप पाटील चिखलीकर,सचिन पाटील, सर्व चिखलीकर कुटुंबीय यांच्या समवेत वाढदिवस झाला,व त्यानंतर सिडको येथे लोंढे सांगवी येथे माधवराव पाटील लोंढे यांनी जल्लोषात स्वागत केले. तर टेळकी येथे सरपंच संदीप मोरे देशमुख यांनी भव्य सत्कार व अन्नदानाचा कार्यक्रम केला, त्यानंतर भोपाळ वाडी कलंबर फाटा येथे उपसभापती नरेंद्रजी गायकवाड सभापती आनंदराव पाटील शिंदे यांनी येथे सन्मान केला ,पांगरा येथे विश्वनाथराव कौशल्ये माध्यमिक विद्यालय येथे वृक्षारोपण व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक श्रीकांत गायकवाड सर, चव्हाण सर, ताटे सर,शेख सर,जाधवसर ,स्वामी मॅडम, सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती व गावकरी मंडळींचे उपस्थिती होती कंधार येथे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचा कीर्तन सोहळा श्री संत नामदेव महाराज मंगल कार्यालय येथे संपन्न झाला, तेथेही कंधार तालुक्यातील सर्व मंडळींचे स्वागत स्वीकारले , कंधार येथून लोहा येथे राम पाटील कारेगावकर यांच्या कार्यालयात सत्कार स्वीकारला ,तसेच सूर्यकांत पाटील गायकवाड यांनी यथोचित सन्मान केला, यांनीही प्रवीण पाटील यांचा वाढदिवस साजरा केला, अशा पद्धतीने लोहा तालुक्यातील अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मान झाला लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात अविनाश पाटील पवार यांनी रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला व या कार्यक्रमाला अनेक मंडळीनी रक्तदान केले .नंतर पार्डी येथे माधवराव पाटील गायकवाड सूर्यकांत पाटील गायकवाड कारेगाव येथे दिलीप पाटील किरवले, राम पाटील किरवले रावसाहेब पाटील किरवले सदाशिव किरवल,बालाजी मोरे यांनी त्यांचे कार्यकर्ते स्वागत केले हरसद पाटी येथे ही स्वागत झाले अंबेसांगवीकर येथे गंगाधर पाटील कदम विक्रम पाटील कदम माधवराव सावंत हिरामन कदम नितीन कदम यांनीही प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांचा वाढदिवस साजरा केला ,अशा पद्धतीने आज दिवसभर युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्यावर आशीर्वाद रुपी प्रेमाचा वर्षाव वाढदिवसाच्या निमित्त होताना दिसून आला असेही युवा नेतृत्व आणि या नेतृत्वाला भाजपमध्ये खूप प्रेरणादायी कार्य केल्याचे या वाढदिवसातून असंख्य लोकांनी त्यांच्यावर जो काही आज आशीर्वाद रुपी वर्षाव केला त्यातून दिसून येते खरोखरच प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांचे कार्य अतुलनीय आहे शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्यातही ते सहभागी होतात अशा ह्या नेतृत्वाला भावी काळामध्ये विधानसभा सदस्यत्व आमदारकी मिळावी हीच श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याकडे व श्री साईबाबा यांच्याकडे सर्वांनी प्रार्थना प्रत्येक ठिकाणी भावी आमदार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशाच घोषणा देत होते व प्रवीण पाटील चिखलीकर साहेब यांच्या त्यांचे संघटन कौशल्य नेतृत्व हे सर्व काही दिसून आले या वाढदिवसासाठी नामदेव चव्हाण,बालाजीराव गायकवाड, रावसाहेब सुर्यवंशी,नरेश गटलेवार, प्रवीण धुतमल,बाळू पवार ,सूर्यकांत गायकवाड, शहाजी पवार, अविनाश पवार ,प्रभाकर पाटील कदम ,रामेश्वर किरवले अंकुशराव कदम,शेख सर,सर्व मंडळी उपस्थित होते