दैनिक चालु वार्ता खानापूर प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी
देगलुर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी सौ. सौम्या शर्मा मॅडम यांना देगलुर तालुक्यातील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने अंबाजोगाई जि. बीड येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नामफलकाची काही अज्ञात समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे. सदरील अतिशय निंदनीय कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा त्वरित तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देगलुर तालुक्यातील धनगर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी बालाजी शेळके अंतापुरकर,प्रा.डाॅ.गोविंद पाटील वझरगेकर,ॲड योगेश मंत्री, वजीरे सर,सरपंच प्रतिनिधी रुक्माजी औरादे, सरपंच विजय पाटील रामपुरकर, सरपंच पांडुरंग राजुरे संदिप राजुरे,श्याम पाटील कोकणे, माजी सरपंच नागनाथ कोकणे, ज्ञानेश्वर चिंतले, तुकाराम पाटील, शिवा हेन्टे,ज्ञानेश्वर कोकणे,किशन राजुरे, व्यंकटेश पाटील वझरगेकर , दै.चालु वार्ता खानापूर प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी, गणेश सुर्यवंशी आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अज्ञात व्यक्तीवर कारवाई नाही झाल्यास सकल धनगर समाज रस्त्यावर उतरून तीव्र पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा प्रशासनाला देण्यात आला.
