
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-प्रदिप मडावी
राजूरा
अतिशय दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या कासवा पैकी 20 नखि कासव हो जात आहे. व त्या कासवाच्या साहाय्याने मंत्रिक वापर करून गुप्तधन शोध काही लोकांन कडून केल्या जाते.असे ऐकण्यात आले.
कार्तिकी ही शिकवणी वर्ग करून परत घरी येत असताना तिला रोड च्या बाजूला विस नखी कासव दृष्टित आला.तिने कुतूहलाने दगड समजून तो घरी आणून आई वडिलांना दाखवला.
वडिलांनी काही लोकांना दाखवला तर तो वीस नखीं कासव असून कोण तरी वाईट कृत करण्यासाठी घरी आणून ठेवला असेल व तो चुकून रोड वर आला असे गृहीत धरू लागले. हि बातमी वाऱ्यासारखी पूर्ण वॉर्डातील लोकांना माहिती झाली.बरेच लोक पैसे देतो आम्हाला द्या अशी पण मागणी करत होते.पण लहानशा चिमुकलीला वाटायचे की कोणी तरी ह्याला विकत घेतील व ह्याचा जीव घेतील असे वाटायला लागले. ती रडून आपल्या आई बाबा ला सांगितले की ह्याला कुणाला विकू नका .आपण ह्याला ह्याच्या घरी मारू नाही .मुलीचे कमी वयात शब्द ऐकून आई बाबा पण मुलीचे कव्तुक करून तिला सोबत घेऊन राजुरा येथील वर्धा नदीवर नेऊन कार्तिकी च्या हाताने तो कासव नदी प्रवाहात सोडण्यात आला .ह्या घटनेची माहिती होताच बऱ्याच लोकांनी कार्तिकी कुळमेथें च्या घरी भेट देऊन अभिनंदन केले.