
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी-
मौजे भाकसखेडा ता.उदगीर येथे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी माननीय उपविभागीय अधिकारी प्रवीण जी मेंगशेटी साहेब व तहसीलदार रामेश्वर जी गोरे साहेब तसेच उदगीरचे गटविकास अधिकारी महेशजी सुळे साहेब यांच्या उपस्थितीत माननीय प्रवीण जी मेंगशेटी साहेब उपविभागीय अधिकारी उदगीर त्यांच्या हस्ते नारळ, जांभळ, आंबा असे विविध प्रकारचे वृक्ष लागवड करण्यात आली. त्यावेळी माननीय माजी राज्यमंत्री संजयजी बनसोडे साहेब यांच्या हस्ते व या मान्यवरांच्या उपस्थितीत गेल्यावर्षी लावण्यात आलेल्या वृक्षाची पाहणी माननीय उपविभागीय अधिकारी व माननीय तहसीलदार साहेब यांनी केली ग्रामपंचायत भाकसखेडा व जगदंबा प्रतिष्ठान भाकसखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षी एकूण 11000 वृक्ष लागवड करण्यात आली होती. ती वृक्ष सध्या बहरलेली आहेत. त्याची पाहणी मान्यवरांनी केली. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच श्रीमती अर्चना खेडकर, उपसरपंच अरविंद मोरे, तसेच जगदंबा प्रतिष्ठानचे सचिव व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विवेक जाधव, ग्रामसेवक नरेंद्र पांचाळ, ग्रामपंचायतचे गुलाब पठाण, सेवक उद्धव कांबळे, नरसिंग जाधव, दयानंद मोरे, श्याम जाधव, तुकाराम मोरे, गोपाळ जाधव, राम जाधव, तुकाराम जाधव, सुनील बिरादार, विष्णुकांत जाधव, ग्रामविकास अधिकारी देवर्जन श्री मांडोळे, लिंबजी खेडकर, मंडळ अधिकारी पंडित जाधव हे व इतर अनेक वर्ष प्रेमी नागरिक उपस्थित होते.