
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
नांदुरा :दि.५. नांदुरा-मोताळा रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर बाभळीचे झाड झुकलेल्या अवस्थेत आहे. पावसाळा सुरू असतांनाही सार्वजनिक बांधकाम विभागाने रोडचे रूंदीकरण व डांबरीकरण युद्ध पातळीवर पूर्ण केले आहे. त्यामुळे वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. काही वेळेस मोठे वाहन अर्थात ट्रक किंवा एसटी ह्या झाडाच्या बाजूने जातांना फांद्या घासतात, परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे झाडांचे वजन वाढुन झाड अधिक झुकेल किंवा मुळा सैल झाल्यास झाड रस्त्यावर पडून अपघात होऊ शकतो.मोठा अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदार कोण?. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी सामान्य नागरिकांन कडुन होत आहे.